Viral Video: द्राक्ष खाल्ल्याने होतोय आजार, जाणून घ्या नेमकं कारण काय? (Watch Video)
असं सांगितलं जातं की, सीजन प्रमाणे फळ खावीत पण तुम्ही खात असलेली फळं ही आरोग्याला हानिकारक आहे.
Viral Video: असं सांगितलं जातं की, सीजन प्रमाणे फळ खावीत, पण तुम्ही खात असलेली फळं ही तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे. फळांवर कीटकनाशकांची फवारणी केली जात असते त्यामुळे फळ नेहमी स्वच्छ धुवून खावीत. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत आहे, ज्यात एका तरुणांने सांगितले आहे की, भारतात अनेक व्यक्तींना घशाचे आजार जाणवू लागले आहे. याचे नेमके कारण या व्हिडिओत दिसून आले आहे. घशात जळजळ आणि ताप येण्याचे प्रमाण वाढत आहे. वातावरणांमुळे या गोष्टी जाणवत होत्या पण हे कारण नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, द्राक्षे जास्त वेळ टिकून राहावित किंवा लवकर खराब होऊ नयेत या करिता पेस्टिसाईड मोठ्या प्रमाणात केले जात आहे. हे द्राक्षे खाल्ल्याने लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. याच व्हिडिओच्या आधारे काहींनी असा दावा केला आहे की, ही द्राक्षे खाल्ल्याने कॅसर होऊ शकतो. (हेही वाचा- बेंगळूरूमध्ये 75 शेफनी तयार केला 123 फुट लांबीचा जगातील सर्वात मोठा डोसा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)