Viral Video: चालत्या बसमध्ये महिलेने ब्रशने घासले आपले दात; Telangana मधील मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Watch)

ही महिला प्रवास करताना बसमध्ये चक्क ब्रशने दात घासताना दिसत आहे. ही घटना नेमकी कोणत्या डेपोच्या बसमध्ये घडली हे अद्याप समजू शकलेले नाही.

Viral Video: चालत्या बसमध्ये महिलेने ब्रशने घासले आपले दात; Telangana मधील मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Watch)
Women Brushing Teeth in Moving Bus

तेलंगणात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यावर महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांसाठी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा आणली गेली. दररोज अनेक महिला या सेवाचा लाभ घेत आहेत. आता अशाच एका बसमधील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही महिला प्रवास करताना बसमध्ये चक्क ब्रशने दात घासताना दिसत आहे. ही घटना नेमकी कोणत्या डेपोच्या बसमध्ये घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का मात्र नक्कीच बसला आहे. याआधी असेच एका बसमध्ये एक महिला भाजी निवडताना दिसली होती. (हेही वाचा; Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनमध्ये 'चुकून' दिले गेले मांसाहारी जेवण; वृद्ध व्यक्तीने IRCTC पँट्री कामगारांना मारली थप्पड, जाणून घ्या काय घादापे पुढे)

पहा व्हिडिओ-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2024 04:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).