Tilefish Viral Video: सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या माशाचा व्हिडिओ व्हायरल, पहा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मासा एका क्षणात कसा रंग बदलत आहे.

Tilefish Viral Video (PC - X/@ThebestFigen)

Tilefish Viral Video: निसर्गात असे काही प्राणी आहेत, ज्यांच्या वैशिष्ट्यांमुळे प्रत्येक माणूस थक्क होतो. या विचित्र प्राण्यांमध्ये एका माशाचाही समावेश आहे जो सरड्यासारखा रंग बदलू शकतो. तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. या माशाला टाईलफिश किंवा फ्लॅशिंग टाईलफिश म्हणतात. या माशाचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, मासा एका क्षणात कसा रंग बदलत आहे. हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @ThebestFigen नावाच्या यूजरने शेअर केला आहे. (हेही वाचा - Dog Attacking 2 Year Old Video: गाझियाबादमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत कायम; गार्डनमध्ये खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलाचा 4 कुत्र्यांनी घेतला चावा, Watch Video)

व्हायरल व्हिडिओ पहा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)