Viral Video: काय सांगता! चक्क हत्तीने कचराकुंडीत उचलून टाकला कचरा, पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हत्ती कचऱ्याच्या डब्याजवळ येत आहे आणि नंतर त्याची सोंड आणि पाय वापरून कचरा उचलून डब्यात टाकताना दिसत आहे.

Elephant Viral Video (PC - Twitter)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या हत्तीने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या हत्तीने कचराकुडींशेजारी पडलेला कचरा उचलून कचराकुडींत टाकला. कचरा उचलण्यासाठी आणि योग्य ठिकाणी टाकण्यासाठी हत्तीने सोंडीचा वापर केला. माणसं पाहिजे तिथे कचरा टाकत असताना प्राणी त्याच्यासमोर आदर्श ठेवत आहेत. हत्तीने कचरा कुंडीत कचरा टाकून प्राणी मानवापेक्षा जास्त शिस्तबद्ध असल्याचं उदाहरण ठेवलं आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हत्ती कचऱ्याच्या डब्याजवळ येत आहे आणि नंतर त्याची सोंड आणि पाय वापरून कचरा उचलून डब्यात टाकताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "सफारी चौकीवरील कचरा कचरापेटीत टाकताना हत्ती" (हेही वाचा - Snake Viral Video: 15-फूट-लांब किंग कोब्राला सर्प मित्राने केलं रेस्क्यू; व्हिडिओ पाहून फुटेल तुम्हाला घाम, Watch)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)