Singapore Shocker: मरीना बे कॅसिनोमध्ये व्यक्तीने जिंकले 4 मिलिअन डॉलर्स; उत्साहाच्या भरात आला हृदयविकाराचा झटका, जागीच मृत्यू (Watch Video)

या ठिकाणी विविध इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी चार स्तरांवर गेमिंग फ्लोअर स्पेस आणि 2,300 स्लॉट मशीन्सवर गेम खेळण्याचे पर्याय आहेत.

Representational Image (File Photo)

सिंगापूरच्या कॅसिनो मरीना बे मधून मृत्यूचे एक आश्चर्यकारक प्रकान समोर आले आहे. या ठिकाणी 4 मिलिअन डॉलर्स म्हणजे जवळपास 33 कोटी रुपये जिंकल्यानंतर विजेत्याला उत्साहामुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तेथे उपस्थित असलेले इतर लोकही चक्रावून गेले. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर व्हायरल होत आहे. कॅसिनोमध्ये जिंकलेली रक्कम ऐकून व्यक्तीला प्रचंड आनंद झाला व त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी आसपासच्या लोकांनी त्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र, त्यांना यश मिळू शकले नाही.

सिंगापूरचा मरीना बे कॅसिनो हा जगातील सर्वात प्रसिद्ध कॅसिनो पैकी एक आहे. या ठिकाणी विविध इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीन्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी चार स्तरांवर गेमिंग फ्लोअर स्पेस आणि 2,300 स्लॉट मशीन्सवर गेम खेळण्याचे पर्याय आहेत. या ठिकाणी 500 गेमिंग टेबल्स आणि 1,600 जॅकपॉट मशीन्स आहेत. (हेही वाचा: Viral Video: उड्डाणा दरम्यान विमानाचा दरवाजा उघडला, महिला पायलट थोडक्यात बचावली)

पहा व्हिडिओ-