Rs 3 Lakh Fee To Get Rich 'Rishtas': मुलीच्या लग्नासाठी फक्त श्रीमंत कुटुंबातूनच स्थळे यावीत, वडिलांनी भरली 3 लाख रुपये फी, पोस्ट व्हायरल (See Post)
या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, एका व्यक्तीने आपल्या मुलीसाठी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या श्रीमंत कुटुंबांची स्थळे यावीत म्हणून तब्बल 3 लाख रुपये फी दिली आहे.
Rs 3 Lakh Fee To Get Rich 'Rishtas': लोक नेहमीच आपल्या मुलांसाठी चांगला जोडीदार शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मुलीच्या कुटुंबाला तर मुलीला कसले स्थळ मिळते, तिचा जोडीदार कसा असेल, सासू-सासरे कसे असतील याबाबत जास्त चिंता असते. मुलीच्या आनंदासाठी वडील कोणत्याही थराला जायला तयार होतात. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर वापरकर्त्याने शेअर केलेली एक घटना दर्शवते की, मुलीला चांगले स्थळ मिळावे मिळावे म्हणून एका वडील काय करू शकतात.
या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, एका व्यक्तीने आपल्या मुलीसाठी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या श्रीमंत कुटुंबांची स्थळे यावीत म्हणून तब्बल 3 लाख रुपये फी दिली आहे. या यूजरने सांगितले की, तिच्या एका मैत्रिणीच्या वडिलांनी फक्त फी म्हणून 3 लाख रुपये भरले आहेत, जेणेकरून त्यांच्या मुलीचे फक्त श्रीमंत कुटुंबातील स्थळे येतील. या प्रकरणाने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे आणि लोक लग्नासाठी किती खर्च करण्यास तयार आहेत यावर चर्चेला उधाण आले आहे. (हेही वाचा: Man Marries Mother-In-Law: ऐकावे ते नवलंच! जावयाचे सासूशी अनेक महिन्यांपासून अफेयर; सासऱ्याला समजताच गावकऱ्यांसमोर लावून दिले लग्न)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)