Internet Usage बद्दल तुम्हांलाही Court Order चा इमेल? PIB Fact Check चा हा Phishing Scam असल्याचा खुलासा

ईमेल मिळणर्‍यांना अनुचित ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असल्याचा खोटा आरोप केला जात आहे आणि कायदेशीर कारवाईची धमकी देखील देण्यात आली आहे.

PIB Fact Check | X @PIB

तुमच्या इंटरनेट वापरावर न्यायालयाचा आदेश आहे असा धक्कादायक ईमेल तुम्हाला मिळाला आहे का? जर असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. सरकारने या घटना स्कॅम असल्याचं सांगितलं आहे.तसेच सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत PIB फॅक्ट चेक च्या X अकाऊंट वर, हा अलर्ट पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये यूजर्सना भारतीय गुप्तचर विभागाकडून येणाऱ्या बनावट ईमेलबद्दल इशारा देण्यात आला होता. PIB फॅक्ट चेकनुसार, हा फिशिंग स्कॅम असू शकतो. हा ईमेल मिळणर्‍यांना अनुचित ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असल्याचा खोटा आरोप केला जात आहे आणि कायदेशीर कारवाईची धमकी देखील देण्यात आली आहे.

पीआयबी फॅक्ट चेक पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement