Hummer H1 'X3' Viral Video: दुबईतील अब्जाधीश शेख हमाद यांच्या हमरचा व्हिडिओ व्हायरल; नेहमीच्या मॉडेलपेक्षा 3 पट मोठा आहे आकार (Watch)
मोटोरियसच्या अहवालानुसार, तिप्पट आकारामुळे याला Hummer H1 3X असे नाव देण्यात आले आहे. ही गाडी 46 फूट लांब, 21.6 फूट उंच आणि 19 फूट रुंद आहे.
विशाल Hummer H1 'X3' गाडीचा एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही गाडी दुबईचे अब्जाधीश शेख हमद बिन हमदान अल नाह्यान यांची आहे. हे शेख 'दुबईचा इंद्रधनुष्य शेख' म्हणूनही ओळखले जातात. विशेष म्हणजे शेख यांची ही हमर नेहमीच्या मॉडेलपेक्षा खूपच मोठी आहे. हमाद यांना ऑटोमोबाईल्सची आवड आहे. शेख त्यांच्या संपत्तीसोबतच त्यांच्या प्रचंड कार संग्रहासाठीही ओळखले जातात. हमाद यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्यांच्या गाड्यांवर खर्च केला आहे. याच संग्रहाचा एक भाग म्हणजे Hummer H1, जो नियमित आवृत्तीपेक्षा खूप मोठा आहे. या मोठ्या आकाराच्या Hummer H1 चा आकार सामान्य मॉडेलपेक्षा 3 पट मोठा आहे.
मोटोरियसच्या अहवालानुसार, तिप्पट आकारामुळे याला Hummer H1 3X असे नाव देण्यात आले आहे. ही गाडी 46 फूट लांब, 21.6 फूट उंच आणि 19 फूट रुंद आहे. शेख हमद यांच्यासाठी ही गाडी खास तयार करण्यात आली आहे. शेख हमद हे अमिरातीच्या राजघराण्याचे सदस्य आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 20 अब्ज डॉलर आहे. (हेही वाचा: Mercedes-Benz G-Class भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)
दुबई के अरबपति शेख हमाद की हमर का वीडियो वायरल
◆ रेग्युलर मॉडल से कही बड़ी है Hummer H1
◆ इस मॉडल के सामने स्टैंडर्ड वर्जन बौने जैसे #suv #sheikhhamdan #viral #HummerH1 pic.twitter.com/qGQIDL5aJN
— News24 (@news24tvchannel) July 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2023 11:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

