Gwalior Shocker: महिलांनी चक्क विटा आणि सिमेंटने झाकले शिव मंदिरातील शिवलिंग; समोर आले विचित्र कारण (Watch Video)

त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तणाव पसरला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानुसार तपास सुरू करण्यात आला.

Women Seal Shivalinga with Bricks and Cement (Photo Credits: X/@chauthakhamba)

Women Seal Shivalinga with Bricks and Cement: श्रावण महिन्यात शिवलिंगाशी संबंधित एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरात, शहराच्या मध्यभागी असलेल्या शिव मंदिरातील शिवलिंग चक्क विटा आणि सिमेंटने झाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक लोक मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले असता हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात तणाव पसरला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानुसार तपास सुरू करण्यात आला. अखेर कृष्णासह सविता अग्रवाल आणि विमला रजक या महिलांनी मिळून हा संपूर्ण प्रकार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांना नोटीस देऊन सोडून दिले आहे, तर सरिता अग्रवाल ही एक महिला अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीमध्ये 45 वर्षीय आरोपी महिला कृष्णाने सांगितले की, तिच्या स्वप्नात भगवान शिव आले होते व त्यांनी आदेश दिला की, पिंड मोठी करण्यासाठी तिला झाकून टाका. त्यामुळे या महिलांनी विटा आणि सिमेंटच्या साहाय्याने शिवलिंग झाकून टाकले. रिपोर्टनुसार, आरोपी महिलांचे मानसिक संतुलनही चांगले नाही. या प्रकरणी स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, ते पुढील सोमवारी पुन्हा मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करणार आहेत. (हेही वाचा: Alien Temple in Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये एका तरुणाने बांधले एलियनचे मंदिर,म्हणाला- नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणार-VIDEO)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)