Alien Temple in Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये एका तरुणाने बांधले एलियनचे मंदिर,म्हणाला- नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणार-VIDEO

तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे मल्लमुपंबत्ती येथे राहणारा लोगनाथन आपल्या गावात परग्रहवासीयांसाठी (दुसऱ्या जगातील लोकांसाठी) मंदिर बांधत आहे.

Alien Temple in Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये एका तरुणाने बांधले एलियनचे मंदिर,म्हणाला- नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणार-VIDEO
Photo Credit: X

Alien Temple in Tamil Nadu: तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे मल्लमुपंबत्ती येथे राहणारा लोगनाथन आपल्या गावात एलियनचे (दुसऱ्या जगातील लोक) मंदिर बांधत आहे. ते म्हणतात की जगात नैसर्गिक आपत्ती सतत वाढत आहेत. या संकटांना थांबवण्याची ताकद केवळ एलियनमध्ये आहे.म्हणून त्याने एलियनचे  मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. लोगनाथनही या मंदिरात दररोज एलियनची पूजा करतात. या मंदिराच्या उभारणीचे काम अजूनही सुरू असून, ते काही महिन्यांत पूर्ण होईल.हेही वाचा: Alien Spotted: कारच्या मागच्या सीटवर बसलेला दिसला चक्क एलियन ? फोटो व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिराचे बांधकाम 2021 पासून सुरू आहे. हे मंदिर लोगनाथनचे गुरु सिद्ध भाग्य यांच्या जीवनसमाधीजवळ आहे. लोगनाथन म्हणाले की, परग्रहवासीयांसाठी आजपर्यंत कुठेही मंदिर बांधलेले गेले नाही आहे. त्यामुळे या मंदिराच्या दर्शनासाठी दूरदूरहून लोक येत असतात.

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलियन मंदिर बांधणाऱ्या लोगनाथननेही दावा केला आहे की, तो एलियनशी बोलतो. त्यांनी याआधीही एलियन्सशी बोलून त्यांच्या परवानगीने हे मंदिर बांधले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की एलियन्स आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला परग्रहावरील अस्तित्वावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवावा लागेल, त्यानंतर तुम्ही 22 मिनिटे ध्यान केले तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन-चतुर्थांश एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या मंदिरात एलियन्सशिवाय भगवान शिव, माता पार्वती, माता काली आणि भगवान मुरुगन यांसारख्या देवतांच्या मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2024 07:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).