Madhya Pradesh: बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; जखमी विद्यार्थिनीला करण्यात आलं रुग्णालयात दाखल, Watch Video
या मारामारीत जखमी झालेल्या विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात ट्रॉमा सेंटर बैधनमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही वेळाने विद्यार्थिनींचा एक गट रुग्णालयात आला. या ग्रुपमध्ये काही मुलंही होती.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात दोन शाळकरी मुली प्रियकरासाठी एकमेकांशी भिडल्या. त्यांनी एकमेकांचे केस ओढून शाळेच्या आवारात एकमेकांना लाथा-बुक्क्या मारल्या. या मारामारीत एक विद्यार्थिनी जखमी झाली, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कसेबसे प्रकरण निवळले. ही घटना सिंगरौली जिल्ह्यातील नवानगर सरकारी शाळेची आहे. येथे आठवी आणि नववीच्या विद्यार्थिंनींमध्ये वाद झाला. विद्यार्थिनीच्या प्रियकरावरून दोघींमध्ये वाद झाला होता. वाद इतका वाढला की, दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारामारीत जखमी झालेल्या विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात ट्रॉमा सेंटर बैधनमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही वेळाने विद्यार्थिनींचा एक गट रुग्णालयात आला. या ग्रुपमध्ये काही मुलंही होती. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्याकडे चाकूही होता. हे पाहून हॉस्पिटलमधील लोकांनी त्याचा पाठलाग करून बाहेर काढले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)