Fact Check: केंद्र सरकार सर्वांना देणार मोफत स्मार्टफोन? सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल, जाणून घ्या सत्य
एका व्हिडिओमध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री स्मार्टफोन योजना 2023' ही नवी योजना चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार एका योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना मोफत स्मार्टफोन देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 'सरकारी व्लॉग' हे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या एका व्हिडिओमध्ये केंद्र सरकार 'प्रधानमंत्री स्मार्टफोन योजना 2023' ही नवी योजना चालवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार सर्वांना मोफत स्मार्टफोन देत आहे.
आता पीआयबीने या संदेशाची सत्यता तपासली असता, तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा असल्याचे आढळून आले आहे. पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये दावा केला आहे की, हा व्हिडीओ खोटा असून हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. अनेक वेळा अशा व्हिडिओंसोबत काही लिंक्सही शेअर केल्या जातात व त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती या लिंक्सवर मागवली आहे. त्या लिंकवर क्लिक करताच तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सकडे जाते. यामुळे तुमचे बँक खाते हॅक होऊ शकते किंवा अशी वैयक्तिक माहितीही अनेक वेळा सार्वजनिक डोमेनमध्ये जाते, जी तुमच्यासाठी योग्य नाही. (हेही वाचा: सर्व आधार कार्ड धारकांना केंद्र सरकार 4,78,000 रुपये कर्ज देण्याचा दावा खोटा, सोशल मीडियावरील मेसेजपासून सावधान!)
⚠️Fraud Alert
'Sarkari Vlog' नामक #YouTube चैनल के एक वीडियो में यह दावा किया गया है कि ‘प्रधानमंत्री स्मार्टफोन योजना 2023’ के तहत केंद्र सरकार सभी को फ्री में स्मार्टफोन उपलब्ध करवा रही है#PIBFactCheck
▶️ यह वीडियो #फ़र्ज़ी है
▶️ यह धोखाधड़ी का प्रयास है, कृपया सावधान रहें pic.twitter.com/SbhXUp4q1c
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2023 11:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

