Condoms Sell via Swiggy Insta Mart: आयपीएल फायनलच्या संध्याकाळी स्विगी इंस्टामार्टद्वारे 2423 कंडोमची विक्री; ट्वीटमध्ये Durex India ला केले टॅग
सध्या यंदाच्या आयपीएलची फायनल मॅच सुरु आहे, अशात स्विगीने त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे झालेल्या कंडोमच्या विक्रीबद्दल माहिती दिली आहे.
आजकाल लोक ग्रोसरी सर्व्हिस प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन गोष्टी विकत घेत आहेत. भाज्यांपासून ते अंडी-चिकनपर्यंत, कंडोम पासून ते सॅनिटरी नॅपकिनपर्यंत सर्व काही ऑनलाइन खरेदी केले जात आहे. यामध्ये स्विगी इंस्टामार्टची लोकप्रियता वाढली आहे. सध्या यंदाच्या आयपीएलची फायनल मॅच सुरु आहे, अशात स्विगीने त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे झालेल्या कंडोमच्या विक्रीबद्दल माहिती दिली आहे. स्विगीने म्हटले आहे की, 'स्विगी इंस्टामार्टद्वारे आतापर्यंत 2423 कंडोम वितरित केले गेले आहेत. आज रात्री 22 पेक्षा जास्त खेळाडू खेळत आहेत असे दिसते.' या ट्वीटमध्ये स्विगीने ड्युरेक्स इंडियालाही टॅग केले आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन संघामध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम लढत होत आहे. (हेही वाचा: आता कॅब ड्रायव्हर रद्द करणार नाही तुमची राइड; ओलाने लॉन्च केली 'प्राइम प्लस' सेवा, जाणून घ्या सविस्तर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)