Uttar Pradesh: एटामध्ये रोडवेज बसने दुचाकीस्वाराला चिरडले; 12 किलोमीटरपर्यंत ओढत नेली बाईक, Watch Video

शुक्रवारी रात्री 11 वाजता शहरातील मोहल्ला शांती नगर आंधी मोड येथे राहणारा 26 वर्षीय विकास हा त्याच्या मित्रांसोबत ढाब्यावर जेवायला गेला होता. जेवण करून तिघे मित्र परतायला लागले पण तोपर्यंत त्यांची बाईक पंक्चर झाली. विकास बाईक घेऊन पायी निघाला. त्यामुळे मागून येणाऱ्या फाजलगंज डेपोच्या रोडवेज बसने त्याला ओढत नेले.

Bike rider crushed by roadways bus (PC - Twitter)

Uttar Pradesh: सिटी कोतवाली हद्दीतील महामार्गावरील गोशाळेजवळ पायी पंक्चर झालेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणाला रोडवेज बसने सुमारे 12 किलोमीटर ओढत नेले. यात दुचारीस्वराचा जागीच मृत्यू झाला. बसने दुचाकीला 12 किलोमीटरपर्यंत ओढले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून बस अडवली. यादरम्यान प्रवाशांचा जीवही धोक्यात आला होता. बस चालकाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजता शहरातील मोहल्ला शांती नगर आंधी मोड येथे राहणारा 26 वर्षीय विकास हा त्याच्या मित्रांसोबत ढाब्यावर जेवायला गेला होता. जेवण करून तिघे मित्र परतायला लागले पण तोपर्यंत त्यांची बाईक पंक्चर झाली. विकास बाईक घेऊन पायी निघाला. त्यामुळे मागून येणाऱ्या फाजलगंज डेपोच्या रोडवेज बसने त्याला ओढत नेले.  यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसमध्ये अडकली. (हेही वाचा - Man Kiss King Cobra: माणसाने घेतले किंग कोब्राचे चुंबन (Watch Video))

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement