Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अखेर लग्नबंधनात अडकले अनंत अंबानी व राधिका मर्चंट; समोर आला वरमाला सोहळ्याचा व्हिडिओ (Watch)

राधिका मर्चंटने आपल्या लग्नासाठी अबू जानी संदीप खोसलाने तयार केलेला लेहेंगा निवडला. राधिकाचा ब्राइडल लूक समोर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. यासोबत तिने मॅचिंग हेवी डायमंड ज्वेलरी घातली आहे, ज्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अखेर प्रतीक्षा संपली असून, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांचा वरमालाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. वरमाला सोहळ्यादरम्यान बॅकग्राउंडमध्ये ‘सिया राम’ हे गाणे वाजत असल्याचे ऐकू येत आहे. त्याआधी काही वेळेपूर्वीच अनंतची पत्नी व अंबानी कुटुंबाची लहान सून राधिका मर्चंटचा लग्नातील फर्स्ट लूक समोर आला होता. मोठ्या डायमंड नेकलेसने सजलेली राधिका मर्चंट लाल-पांढऱ्या लेहंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. गुजराती परंपरेनुसार वधूसाठी हे रंग विशेष मानले जातात.

राधिका मर्चंटने आपल्या लग्नासाठी अबू जानी संदीप खोसलाने तयार केलेला लेहेंगा निवडला. राधिकाचा ब्राइडल लूक समोर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. यासोबत तिने मॅचिंग हेवी डायमंड ज्वेलरी घातली आहे, ज्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या लग्नाचा भव्यदिव्य सोहळा अनेक वर्षे स्मरणात राहील यात शंका नाही. अंबानींनी या लग्नाचा प्रत्येक कार्यक्रम भव्य बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. महत्वाचे म्हणजे अनंत अंबानींच्या या ग्रॅण्ड वेडिंगमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सही सहभागी झाले आहेत.

पहा व्हिडिओ- 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement