Viral Video: सिंहिणीला मीठीत घेऊन रस्त्यावर धावली महिला; व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक

व्हिडिओमध्ये एक महिला सिंहिणीला तिच्या मीठीत घेऊन रात्री चालत असल्याचे दिसून येते आहे. तर सिंहिणी गर्जना करत स्वत:ला तिच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

Lioness Viral Video (PC - Instagram/twfeq)

Viral Video: सिंह, वाघ आणि बिबट्या यांसारख्या भयानक प्राण्यांना पाहून सामान्यतः लोक पळून जातात. दरम्यान, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला सिंहिणीला मीठीत घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहे. स्त्रीच्या मीठीत स्वार झालेली नरभक्षक सिंहणी जोरात गर्जना करत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर twfeq नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला सिंहिणीला तिच्या मीठीत घेऊन रात्री चालत असल्याचे दिसून येते आहे. तर सिंहिणी गर्जना करत स्वत:ला तिच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हे दृश्य पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. (हेही वाचा - Leopard In Residential Building in Kalyan: कल्याणच्या चिंचपाडा भागात रहिवासी इमारतीमध्ये घुसला बिबट्या (Watch Video))

 

View this post on Instagram

 

A post shared by توفيق المحمد علي (@twfeq)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now