Waqf Amendment Bill: 'शिवसेना-यूबीटी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की...'; वक्फ दुरुस्ती विधेयकावरील Uddhav Thackeray यांच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न

केंद्र सरकार बुधवारी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करणार आहे. सरकारचे म्हणणे आहे की, याद्वारे वक्फशी संबंधित मालमत्तांचे चांगले व्यवस्थापन सुनिश्चित केले जाईल. मात्र, या विधेयकाविरुद्ध देशभरात आधीच निदर्शने झाली आहेत.

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis

केंद्र सरकार 2 एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या तयारीत आहे. अशात राजकीय प्रतिक्रियांना उधाण येत आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधत एक विधान केले आहे. ठाकरे यांचा पक्ष पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचे पालन करणार की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मंगळवार 1 एप्रिल रोजी एक्स (पूर्वी ट्विटर) वर फडणवीस यांनी लिहिले की, ’वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?’

केंद्र सरकार बुधवारी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करणार आहे. सरकारचे म्हणणे आहे की, याद्वारे वक्फशी संबंधित मालमत्तांचे चांगले व्यवस्थापन सुनिश्चित केले जाईल. मात्र, या विधेयकाविरुद्ध देशभरात आधीच निदर्शने झाली आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, अशा विधेयकामुळे मुस्लिम पक्षाची शक्ती कमी होईल आणि वक्फवरील सरकारी नियंत्रण वाढेल. वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनाशी संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने वक्फ विधेयकाला काँग्रेस आणि इतर काही प्रादेशिक पक्षांसह विरोधी पक्षांनी तीव्र विरोध व्यक्त केला आहे. (हेही वाचा: Waqf Amendment Bill 2024: वक्फ दुरुस्ती विधेयक, लोकसभेत गदारोळ; सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने, कोणाची किती ताकत? जाणून घ्या संख्याबळ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement