Uran Local Train Soon: उरणकरांचे स्वप्न होणार पूर्ण; पार पडला लोकल रेल्वेचा ट्रायल रन, लवकरच सुरु होणार नियमित सेवा (Watch)

शुक्रवारी पहाटे खारकोपर ते उरण मार्गावरून लोकल रेल्वे धावली. हा लोकलचा ट्रायल रन होता, म्हणजेच अवघ्या काही दिवसांत या मार्गावर नियमित लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे.

Uran Local Train

नवी मुंबईतील लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बहुप्रतीक्षित नेरुळ-बेलापूर-खारकोपर-उरण रेल्वे कॉरिडॉरवर लवकरच लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे. शुक्रवारी पहाटे खारकोपर ते उरण मार्गावरून लोकल रेल्वे धावली. हा लोकलचा ट्रायल रन होता, म्हणजेच अवघ्या काही दिवसांत या मार्गावर नियमित लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे. बेलापूर-उरण लोकल ट्रेन प्रकल्प सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले होते, मात्र सिडकोकडून वेळेवर निधी न मिळणे, जमिनीचे हस्तांतरण आणि अन्य कारणांमुळे यास विलंब झाला. या प्रकल्पात सिडकोचा वाटा 67 टक्के आहे, तर रेल्वेचा वाटा 33 टक्के आहे. अनेक वर्षांपासून उरणकरांना लोकल ट्रेनची प्रतिक्षा होती, ही प्रतीक्षा आता संपली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement