Dhule-Dadar Special Express: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं धुळे-दादर विशेष एक्स्प्रेस रेल्वेचं उद्धाटन
धुळे रेल्वे स्थानकावरून आज सकाळी, धुळे-दादर विशेष एक्स्प्रेस रेल्वे सेवेचं, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं.
Dhule-Dadar Special Express: धुळे रेल्वे स्थानकावरून आज सकाळी, धुळे-दादर विशेष एक्स्प्रेस रेल्वे सेवेचं, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे स्थानकावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. ही उद्घाटनीय गाडी धुळ्याहून आज सकाळी 11 वाजता सुटली आणि आजचं संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी दादरला पोहोचण्याचं नियोजित आहे. ही गाडी दादरहून नियमितपणे दर रविवार, सोमवार आणि शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता निघून धुळ्यात त्याच दिवशी रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाणे धुळ्याहून दर सोमवार, मंगळवार आणि शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुटून दादरला त्याच दिवशी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. (हेही वाचा - Nitesh Rane Statement: उद्धव ठाकरेंच्या आजारपणात आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्याचा कट, भाजप आमदाराचे वक्तव्य)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)