Ulhasnagar Crime News: उल्हासनगर येथील भाजपच्या कार्यालयाजवळ गोळीबार, कापरें भरणार क्षण झाला कॅमेरात कैद

संध्याकाळच्या सुमारास चार तरुण रोहरा यांच्या कार्यालयाजवळ आले आणि त्यांनी गोळीबाराचा धक्कादायक व्हिडिओ कॅमेरात झाला कैद.

Ulhasnagar Crime News: (Photo credit - file)

Ulhasnagar Crime News:  मुंबईच्या उल्हासनगर परिसरातील भाजपाचे पदाधिकारी नरेश रोहरा (Naresh Rohara) यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला अशी घटना समोर आली आहे. गोळीबार करण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाला आहे. नरेश रोहरा यांचा बॉडीगार्ड बचावाकर्ता गोळीबार केला. हा धक्कादायक प्रकार संध्याकाळी नरेश रोहरा यांच्या भाजप कार्यालयासमोर घडून आला आहे.  पोलीसांनी या संदर्भात तपासणी सुरु केली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, त्यांचे कार्यालय हे  कम्प नंबर ५ च्या प्रभाराम मंदिर शेजारी  आहे. संध्याकाळी  काही  अज्ञान तरुण हत्यार घेवून आल्याची माहिती मिळाली आहे. चार तरुणांनी त्यांच्या कार्यलयाजवळ येवून गोळीबार केला. ह्याच दरम्यान नरेश यांचा बॉडीगार्ड यांने प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला.  आरोपी पळत असताना त्याला पकडण्यात आले. पकडलेल्या आरोपीला बॉडिगार्डांनी चांगला चोप दिला. या गोळीबार मध्ये कोणाचेही हानी झाली नाही. या प्रकरणाची माहिती उल्हासनगर ही  लाईन पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.  पोलीसांनी या संदर्भात चौकशी चालू केली आहे. सकाळने या प्रकरणाचे वृत्त दिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement