'उद्धव ठाकरेंनी मला मारण्याची सुपारी दिली', केंद्रीय मंत्री Narayan Rane यांचा मोठा आरोप

राणे म्हणाले की, मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला. ज्यांना सुपारी देण्यात आली त्यांनी स्वतः फोन करून मला याबाबत माहिती दिली.

Narayan Rane (Pic Credit - ANI)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मारण्यासाठी सुपारी देण्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात औषध खरेदीतील भ्रष्टाचाराला त्यांनी उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले. पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात औषध खरेदीत भ्रष्टाचार केला होता. नोव्हेंबर 2019 ते जून 2022 पर्यंत ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले होते.

राणे म्हणाले की, मला मारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी देण्याचा प्रयत्न केला. ज्यांना सुपारी देण्यात आली त्यांनी स्वतः फोन करून मला याबाबत माहिती दिली. पण ज्यांना ते सुपारी देऊ पाहत आहेत ते मला हातही लावू शकत नाहीत, हे उद्धव यांना माहीत नव्हते. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवताना भ्रष्टाचार केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement