Traffic Cop Assaulted in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला जमिनीवर ढकलून रिक्षा चालकांची मारहाण; एकाला अटक, तपास सुरु (Watch video)

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला असून, त्यामध्ये दोन-तीन रिक्षा चालक वाहतूक पोलिसाला थप्पड मारताना दिसत आहे.

2 Men Assault Traffic Policeman in Ulhasnagar (Photo Credit: X/ @NITISHJHA21)

Traffic Cop Assaulted in Ulhasnagar: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ड्युटीवर असताना एका वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली. या उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलावर शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मारहाण करणाऱ्या तीघांपैकी एका रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर 2 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या व्हिडिओला दिलेल्या प्रतिक्रियेत ठाणे पोलिसांनी या घटनेचा तपास करत योग्य ती कायदेशीर कारवाई करत असल्याची पुष्टी केली आहे. (हेही वाचा: Malad Slab Collapsed: मालाड येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने तिघांचा मृत्यू, पाच जणांवर गुन्हा दाखल)

उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला जमिनीवर ढकलून मारहाण-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement