Thane Shocker: आपल्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू देण्यासाठी आईने प्रियकराला केली मदत; ठाण्यातील धक्कादायक घटना, तपास सुरू
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर अली आहे. या ठिकाणी एका 38 वर्षीय आईने आपल्या 30 वर्षीय प्रियकराला तिच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करू देण्यासाठी मदत केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कासारवडवली पोलीस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिने 9 नोव्हेंबर 2023 रोजी तिची आई आणि तिच्या प्रियकराला नको त्या स्थितीमध्ये पाहिले होते. मुलीने यावर आक्षेप घेतला असता, आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच बेदम मारहाणही केली. त्यानंतर मुलीच्या आईच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार केला व यासाठी मुलीच्या आईने मदत केल्याची माहिती मिळते.
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: Mumbai Shocker: गोरेगावमध्ये 75 वर्षीय महिलेवर बलात्कार; 20 वर्षीय तरुणाला अटक)
आपल्या 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू देण्यासाठी आईने प्रियकराला केली मदत-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)