'सासरच्या मंडळींकडून महिलेच्या स्वयंपाक कौशल्याबाबत टोमणे मारणे ही क्रूरता नाही'- Bombay High Court ने फेटाळली याचिका

सध्याच्या प्रकरणात न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, तक्रारदाराच्या स्वयंपाकाच्या कौशल्याच्या अभावावर भाष्य करणे, हे आयपीसीच्या कलम 498A अंतर्गत परिकल्पित केलेली 'क्रूरते’ची पातळी नाही.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान सांगितले की, महिलेला 'स्वयंपाक कसा करायचा हे माहित नाही' यावर केलेली टिप्पणी ही आयपीसीच्या कलम 498A अंतर्गत क्रूरतेचे प्रमाण नाही. एका महिलेने तिच्या पतीच्या कुटुंबीयांवर क्रूरतेचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या भावजयांसह सासरचे लोक तिला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नसल्याबद्दल सतत टोमणे मारतात व ही क्रूरता आहे. मात्र न्यायालयाने महिलेची ही याचिका आणि एफआयआरही फेटाळला.

न्यायालयाने म्हटले आहे की, आयपीसीच्या कलम 498A नुसार क्षुल्लक भांडण किंवा मारामारी ही 'क्रूरता' ठरत नाही. या कलमांतर्गत गुन्हा ठरवण्यासाठी, जाणूनबुजून केलेल्या वर्तनामुळे महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त होणे किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रथमदर्शनी सामग्री असणे आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणात न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, तक्रारदाराच्या स्वयंपाकाच्या कौशल्याच्या अभावावर भाष्य करणे, हे आयपीसीच्या कलम 498A अंतर्गत परिकल्पित केलेली 'क्रूरते’ची पातळी नाही. यासह, राज्यघटनेच्या कलम 226 आणि CrPC च्या कलम 482 अंतर्गत आपल्या अंगभूत अधिकारांचा वापर करून, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांवरील एफआयआर रद्द केला. फौजदारी कारवाई सुरू ठेवणे हा प्रक्रियेचा दुरुपयोग होईल, असे त्यात म्हटले आहे. (हेही वाचा: High Court On Physical Intimacy: शरीरसंबंध नाकारणे वैहाहिक जीवनात क्रुरताच! घटस्फोटासाठी वैध कारण, हायकोर्टाचे मत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)