Sudhir Mungantiwar Gets Clean Cheat: महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मोठा दिलासा; वृक्ष लागवड घोटाळ्यात मिळाली क्लीन चीट

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर, महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. महाविकास आघाडी सरकारने यावर आक्षेप घेत अनेक आरोप केले होते.

Sudhir Mungantiwar | (Photo Credits-Facebook)

Sudhir Mungantiwar Gets Clean Cheat: महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना वृक्षलागवडीच्या घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. वृक्ष लागवड प्रकरणात कोणताही गैरव्यवहार किंवा गैरप्रकार आढळून आलेला नसल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे मंत्र्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर, महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. महाविकास आघाडी सरकारने यावर आक्षेप घेत अनेक आरोप केले होते. ज्यासाठी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात, वृक्षलागवड मोहिमेत कोणतीही अनियमितता किंवा गडबड झाली नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच राज्यात मोहीम यशस्वी झाल्याचे समितीने स्पष्ट केले. त्यानंतर आर सुधीर मुनगंटीवार यांच्यावरील सर्व आरोप पुसले गेले आहेत. (हेही वाचा: CIDCO Launches Sale Plots And Shops: सिडकोने नवी मुंबईत सुरु केली 48 भूखंड आणि 218 दुकानांची विक्री; जाणून घ्या कुठे कराल नोंदणी)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement