Solapur News: नवीन कार घेवून सोलापूरात मेहुण्याच्या घरी जाताना मोठा आघात, शिक्षक कुटुंबावर दुखाचे डोंगर

एका शिक्षक कुटूंबावर मोठा आघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने नवीन कार घेतल्याबद्दल पेढे देण्यासाठी मेहुण्याच्या घरी जात असताना कारचा घात झाला.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Solapur News: सोलापूरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षक कुटूंबावर मोठा आघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने नवीन कार घेतल्याबद्दल पेढे देण्यासाठी मेहुण्याच्या घरी जात असताना कारचा घात झाला. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. सोलापूरातील भाटेवाडी येथील ही दुर्घटना आहे. कार घेवून चार दिवस ही झाले नव्हते आणि कुटूंबावर मोठा आघात झाला. ईरन्ना बसप्पा जूजगार (४१) असं शिक्षकाचे नाव आहे.

ईरन्ना यांनी पाच दिवसांपुर्वी नवीन कार खरेदी केली. याचा आनंद साजरा करण्यासाठी मेहुण्याच्या घरी जात असाताना कारसह  ईरन्ना आणि वाहन चालक विहीर पडले. हे पाहून गावकऱ्यांनी देखील विहिरीत उडी घातली. सोलापूरातूल डोणगाव जवळील भाटेवाडी गावत पोहोचल्यानंतर ही घचना घडली. गाडीवरील नियत्रंण सुटल्यामुळे ही घटना घडली. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे इतर स्थानिक देखील त्यांना वाचवण्यास आले.

ईरन्ना आणि त्यांच्या चालकाला वाचवण्यात आले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.बेशुध्द अवस्थेत त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपाचरासाठी दाखल केले.परंतू त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement