Shocking Video: गोमांस बाळगल्याच्या संशयावरून Dhule-CSMT Train मध्ये वृद्धाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल, आरोपींना अटक

या घटनेतील संशयित आरोपींना धुळ्यातून ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर त्यांना ठाण्यात आणण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

Arrest | (Representative Image)

महाराष्ट्रात धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका वृद्ध प्रवाशाला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आता याप्रकरणी धुळ्यात शनिवारी आरोपींना पकडण्यात आले. या घटनेचा एक एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अहवालानुसार, अश्रफ हुसेन (72) हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी जळगावहून कल्याणला जात होते. प्रवासादरम्यान त्यांचा इतर सहप्रवाशांशी सीटवरून वाद झाला. त्यावेळी गोमांस बाळगल्याचा आरोप करत इगतपुरीजवळ त्यांना ट्रेनमध्ये शिवीगाळ आणि मारहाण केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीने या वृद्धाचा शोध घेतला. रेल्वे पोलीस आयुक्तांनी या घटनेची पुष्टी केली आणि या प्रकरणी एफआयआर नोंदवून  मारहाण करणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेतले. तक्रारदाराच्या जबाबाच्या आधारे, ठाणे जीआरपी पोलिसांनी 5 हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील संशयित आरोपींना धुळ्यातून ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर त्यांना ठाण्यात आणण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. दुसरीकडे या घटनेनंतर अश्रफ यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. मात्र ती खोटी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि व्हिडीओ शेअर करणे टाळावे. अश्रफ हे सुखरूप असून सध्या ते कल्याण येथे त्यांच्या मुलीच्या घरी आहेत. (हेही वाचा: Haryana Mob Lynching: हरियाणात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी तरुणाला केली बेदम मारहाण; व्यक्तीचा मृत्यू, 5 जणांना अटक)

गोमांस बाळगल्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण-