Shivbhojan Thali: महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांना शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यास मान्यता
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची आर्थिक प्रगती आणि उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात प्रथमच शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
Shivbhojan Thali: महाराष्ट्र शासनाने 2020 मध्ये शिवभोजन थाळी योजना सुरु केली. याद्वारे गरीब, वंचित आणि कष्टकरी लोकांना अत्यंत कमी दरात पोटभर जेवण देण्यात येत आहे. या योजनेच्या अंतर्गत भोजनालय चालविण्यासाठी, सध्याच्या स्थितीत सुरु असलेल्या खानावळ, भोजनालय, एनजीओ, महिला बचत गट, रेस्टॉरंट किंवा मेस यांची समितीव्दारे निवड करण्यात येते. आता राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची आर्थिक प्रगती आणि उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात प्रथमच शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. नागपूर येथे तृतीयपंथीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभाचे वाटप करुन आश्वस्त केले. यात प्रामुख्याने तृतीयपंथीयांसाठी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यास मान्यता देऊन तसे प्रमाणपत्र त्यांना बहाल केले. किन्नर विकास बहुउद्देशिय सामाजिक संस्था आता नागपूर येथून सामाजिक न्यायाचा नवा आयाम सुरु करीत आहे. (हेही वाचा: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत; राज्य सरकारचे स्पष्टीकरण)
पहा पोस्ट-