Sharad Mohol Murder CCTV Footage: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचं CCTV फुटेज आलं समोर, पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ
पुण्यात कुख्यात गुंड मोहोळ याची गोळी घालून हत्या करण्यात आली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात ८ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Sharad Mohol Murder CCTV Footage: पुण्यात सुतारदरा येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळी घालून हत्या करण्यात आली.या घटनेला २४ तास झाल्यानंतर शरद मोहोळ हत्येची थरकाप उडवणारी सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हत्या करण्यात आली. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. शरद सोबत असणाऱ्या बॉडीगार्डने शरदवर गोळीबार केल्याचे स्पष्ट व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान शरदला एक गोळी डोक्यात आणि एक गोळी छातीत आणि दोन गोळ्या मानेला लागल्या. गोळीबार करताच आरोपी घटना स्थळावरून फरार आहे.या घटनेत शरद रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. या घटनेत दोन वकिलांचा देखील हात असल्याची चर्चा होत आहे त्यामुळे पोलिसांनी आरोपींसह या दोन वकिलांना अटक केली आहे.
#CCTV footage captured firing on goon #SharadMohol in Sutardara, Kothrud, #Pune. pic.twitter.com/kzgPlz9kBv
— Punekar News (@punekarnews) January 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2024 02:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

