Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळ मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

Rain | (Photo Credit: Archived, edited, representative images)

हवामान विभागाच्या माहितीनुसार आज 23 मे आणि उद्या 24 मे दिवशी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. असेही नमूद करण्यात आले आहे. नक्की वाचा: Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status .

महाराष्ट्रातील हवामान अंदाज

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement