Raigad Fort Closed For Tourist: रायगड मध्ये अतिवृष्टीनंतर किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद
रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
रायगड मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाद्वारातून पाणी बाहेर पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ झपाट्याने वायरल झाला आहे. त्यानंतर आता आजपासून (8 जुलै) रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. नक्की वाचा: Raigad Rain: रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस; पायर्यांवरील वाहत्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांना लोखंडी खांबाचा आधार (Watch Video).
रायगड पर्यटकांसाठी बंद