Pune Shocker: पुण्यामध्ये इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला डिलेव्हरी बॉय कडून लाकडी काठीने बदडलं; CCTV फूटेज वायरल

दुसरी लिफ्ट वापरण्यास सांगितल्याच्या रागामध्ये डिलेव्हरी बॉयने इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Police | (Photo credit: archived, edited, representative image)

पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड भागात एका इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला एका डिलिव्हरी बॉयने त्याच्या मित्राच्या मदतीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. लाकडी काठीने मारहाण केल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. दरम्यान दुसरी लिफ्ट वापरण्यास सांगितल्याच्या रागामध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये डिलेव्हरी बॉयला ताब्यात घेतले आहे.

सुरक्षा रक्षकाला लाकडी दांडक्यानं मारहाण

खासगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं एका सोसायटीमधील सुरक्षा रक्षकाला लाकडी दांडक्यानं आणि लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली आहे. पुण्यातील हा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे pic.twitter.com/xFWkXhbRXB

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement