Pune Porsche Accident Case: बिल्डरने मुलाला दिली 2.5 कोटींची कार, मात्र 1,758 रुपये फी न भरल्याने नोंदणी रखडली (Video)

या कारसाठी बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून तात्पुरती नोंदणी जारी करण्यात आली होती जी, 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध होती.

पोर्शे कार मालक विशाल अग्रवाल

Pune Porsche Accident Case: पुण्यात शनिवारी झालेल्या पोर्श कार भीषण अपघातात दोन टेक इंजिनीअर्सना प्राण गमवावे लागले आहेत. ही पोर्श कार अनेक महिन्यांपासून नंबर प्लेटशिवाय रस्त्यावर धावत असल्याचा खुलासा पुणे पोलिसांनी केला होता. आता माहिती मिळत आहे की, कार मालकाने 1,758 रुपये फी न दिल्यामुळे 2.5 कोटी रुपयांच्या पोर्श कारची नोंदणी होऊ शकली नाही. याबाबत आरटीओ अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले, ‘ही गाडी बेंगळुरूमधील एका डीलरकडून दिली गेली होती. या कारसाठी बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून तात्पुरती नोंदणी जारी करण्यात आली होती जी, 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध होती. नंतर 18 एप्रिल 2024 रोजी मालकाने कार पुण्यात आरटीओमध्ये नोंदणीसाठी आणली होती. येथे कारची तपासणी केली गेली आणि मंजुरीही देण्यात आली. मात्र याचे विहित शुल्क भरले गेले नाही म्हणून कारसाठी नोंदणी क्रमांक जारी केला गेला नाही. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्समधून सूट देण्यात आली आहे, त्यामुळे या वाहनासाठी नोंदणी शुल्क अवघे रु. 1,758 होते, जे भरले नाही.’ (हेही वाचा: Pune Car Accident Case: पुणे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा अंडरवर्ल्डशी संबंध; संपूर्ण चौकशी करून कारवाईचे Devendra Fadnavis यांचे आश्वासन)

पहा व्हिडिओ-