Pune Ganeshotsav: पुण्यातील ढोल-ताशा पथकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; NGT च्या निर्देशाला दिली स्थगिती
यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ढोल-ताशा पथकांना दिलासा देत, एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली.
Pune Ganeshotsav: आता पुण्यातील गणपती विसर्जन आणि उत्सवादरम्यान 30 हून अधिक लोकांना ढोल-ताशा ग्रुपमध्ये सहभागी होता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशाला स्थगिती दिली. एनजीटीने आपल्या आदेशात पुण्यातील गणपती मूर्ती विसर्जन कार्यक्रम आणि गणपती उत्सवात सहभागी होणाऱ्या 'ढोल-ताशा' गटातील लोकांची संख्या 30 पर्यंत मर्यादित केली होती. एनजीटीने ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने गणपती विसर्जनात सहभागी होणाऱ्या ढोल-ताशा गटातील लोकांची संख्या मर्यादित ठ्वण्याचे निर्देश दिले होते. आता एनजीटीच्या आदेशाविरोधात पुण्यातील 'ढोल-ताशा' समूहाच्या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ढोल-ताशा पथकांना दिलासा देत, एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने यावर राज्य अधिकाऱ्यांना नोटीसही बजावली आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 'ढोल-ताशा' गट हा पारंपरिक सणांचा अविभाज्य भाग आहे. (हेही वाचा: Ganapati Poojan: पीएम नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश DY Chandrachud यांच्या घरी गणपती पूजनाला लावली हजेरी; स्वतः केली आरती)
पुण्यातील ढोल-ताशा पथकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)