Ganapati Poojan: पीएम नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश DY Chandrachud यांच्या घरी गणपती पूजनाला लावली हजेरी; स्वतः केली आरती (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गणेश पूजेला हजेरी लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी गणेश पूजेला हजेरी लावली. याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान सरन्यायाधीश आणि त्यांची पत्नी कल्पना दास यांच्यासह बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधान स्वतः गणपतीची आरती करताना दिसले. व्हिडिओमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी पूजेमध्ये पारंपारिक मराठी टोपी परिधान करताना दिसत आहेत. दरम्यान. डीवाय चंद्रचूड यांचा जन्म मुंबईत देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. शिक्षणानंतर त्यांनी महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये नाव नोंदवले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही वकिली केली. चंद्रचूड यांनी मुंबई विद्यापीठात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे. (हेही वाचा: Rishi Panchami 2024: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती च्या दरबारात 42,000 महिलांकडून आरती संपन्न; India World Record कडून दखल)
PM Narendra Modi Attends Ganpati Poojan at Residence of DY Chandrachud-
Delhi: Prime Minister Narendra Modi attends Ganpati Poojan at the residence of Chief Justice of India (CJI) DY Chandrachud pic.twitter.com/s5qFbMeSqk
— IANS (@ians_india) September 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2024 10:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

