Pune Accident: पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रकने दिली अनेक वाहनांना धडक, एकाचा मृत्यू (Watch Video)

या अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Pune Accident: पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रकने दिली अनेक वाहनांना धडक, एकाचा मृत्यू (Watch Video)
Pune Accident

आज पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवरील कोंढवा स्मशानभूमीजवळ सकाळी भीषण अपघात झाला. उतारावर सिमेंट पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रकने एकामागून एक अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कोंढवा-कात्रज रस्ता इथल्या अपघातामुळे कात्रज नेहमीच चर्चेत राहतो. कोंढवा येथील स्मशानभूमीजवळ सकाळी 9.30 वाजता हा अपघात झाला. अचानक ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने, उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुढे जाणाऱ्या कार, स्कूल व्हॅन आणि दुचाकीला धडक देत तो पुढे सरकत गेला. (हेही वाचा: Pune: विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याने शिक्षकाने केली आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आली धक्कादायक माहिती)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2023 11:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).