PSL Scam: पीएसएल घोटाळ्याप्रकरणी CBI ची मुंबईमध्ये छापेमारी; मोठ्या प्रमाणात डॉलर आणि रोख रक्कम जप्त

कंपनीशिवाय सीबीआयने त्यांचे संचालक अशोक योगेंद्र पुंज, राजेंद्र कुमार बाहरी, चित्तरंजन कुमार, जगदीशचंद्र गोयल आणि आलोक योगेंद्र पुंज यांनाही या प्रकरणात आरोपी ठरवले आहे.

PSL Scam

पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने मुंबईवर छापे टाकले. यादरम्यान सीबीआयने मोठ्या प्रमाणात डॉलर्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत अजूनही छापेमारी शोध सुरू आहे. सीबीआयने गेल्या वर्षी कॅनरा बँकेसोबत कर्ज फसवणूक केल्याप्रकरणी पीएसएल समूह आणि त्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कर्जाची रक्कम चुकवून कॅनरा बँकेची 428.50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कंपनीशिवाय सीबीआयने त्यांचे संचालक अशोक योगेंद्र पुंज, राजेंद्र कुमार बाहरी, चित्तरंजन कुमार, जगदीशचंद्र गोयल आणि आलोक योगेंद्र पुंज यांनाही या प्रकरणात आरोपी ठरवले आहे. सीबीआयने 15 सप्टेंबर रोजी मुंबई आणि गुजरातमध्ये छापे टाकले होते. यादरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचा दावा केला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now