Palghar: महाराष्ट्रातील वसई स्टेशनजवळ भीषण अपघात; मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, जीवितहानी नाही (Video)
या अपघातामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई स्टेशनजवळ आज (27 ऑक्टोबर) मालगाडीचे काही डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. या अपघातामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आठ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये वसई रोड स्टेशनवर मालगाडी रुळावरून घसरल्याचे दिसत आहे. मोटार पायलटने जवळच्या स्टेशन मास्टरला रुळावरून घसरलेल्या ट्रेनची माहिती दिली. त्यानंतर स्थानक प्रशासनाला याची माहिती मिळाली. एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अपघातामुळे त्या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत किंवा अन्य मार्गाने पाठवल्या जात आहेत
(हेही वाचा: Marathwada Suicide Case: मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांची गळफास घेऊन आत्महत्या)