तुळशी, विहार पाठोपाठ तानसा देखील ओव्हर फ्लो; मुंबईकर पाणीकपात दूर होण्याच्या प्रतिक्षेत
मुंबई मध्ये सध्या 10% पाणीकपात लागू आहे. परंतू मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने त्यात होणारी वाढ आनंददायक आहे.
मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे. मध्यरात्री विहार नंतर पहाटे तानसा देखील ओव्हर फ्लो झाल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली 10% पाणीकपात लवकरच दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)