Narendra Modi Cabinet Ministers List: नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा खासदारांचा मंत्रीमंडळात समावेश; Devendra Fadnavis यांनी सांगितली यादी

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील कोणकोणत्या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे याबाबत माहिती दिली.

Narendra Modi Cabinet Ministers List: नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा खासदारांचा मंत्रीमंडळात समावेश; Devendra Fadnavis यांनी सांगितली यादी
नितीन गडकरी, पियुष गोयल (संग्रहित संपादित प्रतिमा)

Narendra Modi Cabinet Ministers List: लोकसभेच्या एनडीएच्या विजयानंतर आता नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी चर्चा सुरु झाली आहे ती नव्या मंत्रीमंडळाची. नव्या खासदारांपैकी मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाकोणाला स्थान मिळाले आहे याचे अंदाज वर्तवले जात आहे. असता आता महाराष्ट्रामधून कोणाची वर्णी लागली आहे याची यादी समोर आली आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील कोणकोणत्या खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदी सरकार आणि एनडीए सरकारमध्ये महाराष्ट्रातील अनेक अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली आहे. मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो. नितीन गडकरी जी, पियुष गोयल जी आणि रामदास आठवले जी पुन्हा सरकारचा भाग होणार आहेत. रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांसारखे तरुण खासदारही सरकारचा भाग असतील. विदर्भातील ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधव हेही मंत्री होत आहेत. (हेही वाचा: पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करण्याची बीडमधल्या कार्यकर्त्यांची मागणी, आज परळीत बंद)

पहा व्हिडिओ-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2024 05:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).