Mumbai Water Cut: मुंबईच्या पिसे जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग; शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा नाही
या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.
Mumbai Water Cut: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना आज सायंकाळी उद्भवली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या भागांमध्ये पुढील 24 तास पाणीपुरवठा होणार नाही. तसेच याचा परिणाम पश्चिम उपनगर आणि शहर विभागातील इतर भागातील पाणी पुरवठ्याच्या दाबावर काही प्रमाणात पडेल. सबब, संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (हेही वाचा: Santacruz Fire: सांताक्रूझमध्ये एका व्यापारी संकुलाला आग, 37 नागरिकांची सुटका)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला आग लागण्याची घटना आज सायंकाळी उद्भवली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे, या… pic.twitter.com/b0eZYTrgbt
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 26, 2024
पाणीपुरवठा बाधित होणारे परिसर#BMCUpdates https://t.co/MhpGTAA1I2 pic.twitter.com/tQqf1MlpIo
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 26, 2024 11:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

