Mumbai Trans Harbour Link (MTHL) Photos: उद्या होणार देशातील सर्वात लांब सागरी सेतू- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन; पहा या पुलाचे काही विहंगम फोटोज (See Photos)
या पुलामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेन रोड ब्रिज आहे.
Mumbai Trans Harbour Link (MTHL) Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 12 जानेवारी रोजी देशातील सर्वात लांब सागरी सेतू- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन करणार आहेत. त्याला अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे. या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2016 मध्ये करण्यात आली होती आणि 7 वर्षांनंतर 12 जानेवारी 2024 रोजी ते देशाला समर्पित करण्यात येत आहे. या पुलामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेन रोड ब्रिज आहे. त्याचा 16.5 किमी लांबीचा भाग मुंबईच्या समुद्राच्या वर आहे आणि 5.5 किमीचा भाग जमिनीच्या वर आहे. हा पूल मुंबई ते नवी मुंबईला जोडणार असून, या दोन्हीमधील अंतर अवघ्या 20 मिनिटांत कापता येणार आहे. असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या हे अंतर कापण्यासाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. हा अटल सेतू मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळही कमी होईल. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज 70,000 हून अधिक वाहने जातील अशी महाराष्ट्र सरकारची अपेक्षा आहे. अशा स्थितीत या लिंक रोडला टोलद्वारे दररोज 1.75 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पहा या पुलाचे विहंगम फोटोज- (हेही वाचा: PM Modi to Inaugurate MTHL: उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू'चे लोकार्पण; 'या' मार्गावर जड वाहतूक राहणार बंद)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)