Mumbai Shocker: गोरेगाव मध्ये 58 वर्षीय व्यक्तीचा घराबाहेर सापडला मृतदेह; पत्नीची देखील घरात गळा दाबून हत्या

जोडप्याने दिल्लीला जाण्यासाठी तिकीट बूक केले होते. अशात त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने खळबळ पसरली आहे.

Death/ Murder Representative Image Pixabay

मुंबईच्या गोरेगाव मध्ये 58 वर्षीय एका पुरूषाचा मृतदेह आढळला आहे. टोपीवाला मेंशन जवळ ही घटना शुक्रवार सकाळची आहे. किशोर पेडणेकर असं मृत व्यक्तीचं नाव असून तो जिमच्या वस्तूंचा व्यावसायिक होता. स्थानिकांना हा मृतदेह दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती कळवली आहे. त्याच्या पत्नीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता घराचं दार आतून बंद होते. दरम्यान घराचं दार उघडताच 57 वर्षीय पत्नी देखील मृतावस्थेमध्ये आढळली. प्राथमिक अंदाजानुसार किशोरने स्वतःचा जीव घेण्याआधी त्याने पत्नीचा जीव घेतला. तो नैराश्यामध्ये होता. त्याच्या घरामध्ये नैराश्य आणि मधुमेहाच्या गोळ्या सापडल्या. या जोडप्याचा मुलगा दिल्ली मध्ये काम करतो. गुन्हा दाखल असून यामध्ये तपास सुरू आहे. UPSC Aspirants Suicide In Delhi: 'माझा मृत्यू ब्रेकिंग न्यूज बनेल...'; UPSC ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीची दिल्लीत आत्महत्या .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement