Mumbai: शिवसेना-यूबीटी गटाचे नेते Abhishek Ghosalkar यांच्यावर गोळीबार; रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर

अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक आहेत.

Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, गुरुवारी मुंबईतील दहिसर भागात एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक आहेत. विनोद घोसाळकर हे माजी आमदार राहिले आहेत. मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. परस्पर वादातून त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अभिषेक घोसाळकर यांना परिसरातील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एमएचबी पोलीस हजर आहेत. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव मॉरिस भाई असे आहे. (हेही वाचा: Mumbai Shocker: पतंग उडवताना टेरेसवरून पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू; मीरा रोड येथील घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement