Mumbai Local 14-Hour Block: पश्चिम रेल्वेवर 14 तासांचा ब्लॉक जाहीर; अनेक गाड्यांवर होणार परिणाम, जाणून घ्या सविस्तर

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत वांद्रे ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत.

मुंबई लोकल ट्रेन (Photo Credits: PTI)

पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक 46 च्या कामासाठी अनेक मार्गांवर 14 तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक उद्या मध्यरात्री सुरू होईल आणि 21 मे 2023 रोजी दुपारी 2:00 वाजेपर्यंत चालेल. याचा परिणाम पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस ट्रेन सेवांवर होईल. ब्लॉक कालावधीत, अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर परिणाम होईल. अप आणि डाऊन लोकल मार्गावरील धीम्या सेवा अंधेरी आणि गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर वळवण्यात येतील, परिणामी राम मंदिर रोड स्टेशनवर या गाड्या थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा फक्त वांद्रेपर्यंत चालतील.

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत वांद्रे ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत. वांद्रे ते गोरेगाव डाउन हार्बर मार्गावरील सेवा 20 मे रोजी रात्री 11:55 ते 21 मे रोजी दुपारी 1:55 पर्यंत आणि गोरेगाव ते वांद्रे अप हार्बर मार्गावरील सेवा 20 मे रोजी 11:33 ते 21 मे दुपारी 2:05 पर्यंत रद्द केले जाईल. (हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय; 2,100 इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेसना हिरवा कंदील; प्रवास होणार अधिक आरामदायी)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement