Mumbai BEST Bus Servises: मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप'; बस सेवांवर परिणाम होण्याची शक्यता
संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या बॅनरखाली बेस्टचे वेट लीज बस चालक मंगळवारी दुपारी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगले वेतन आणि इतर फायदे मिळावेत या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी ते मोर्चा काढतील.
मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अचानक संपामुळे, आज सकाळी बस सेवांवर परिणाम झाला. संघर्ष कामगार कर्मचारी युनियनच्या बॅनरखाली बेस्टचे वेट लीज बस चालक मंगळवारी दुपारी आझाद मैदानावर निदर्शने करणार आहेत. कामाच्या ठिकाणी चांगले वेतन आणि इतर फायदे मिळावेत या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी ते मोर्चा काढतील. सूत्रांनी सांगितले की, मोर्चात सहभागी होणाऱ्या चालकांच्या संख्येमुळे बस सेवांवर थोडासा परिणाम होऊ शकतो. युनियनचे नेते शशांक राव म्हणाले, ‘आम्ही खाजगी कंत्राटदारांना चालकांचे वेतन सुधारण्यासाठी वारंवार विनंती केली. आम्ही यापूर्वी बेस्टलाही उपक्रमात काम करणाऱ्या पूर्णवेळ चालकांसारखे फायदे देण्याची विनंती केली होती, परंतु ती व्यर्थ ठरली. मंगळवारी काढण्यात येणारा मोर्चा कंत्राटी चालकांना येणाऱ्या सर्व समस्यांवर प्रकाश टाकेल. आणखी एका युनियन नेत्याने सांगितले की बेस्टच्या पूर्णवेळ चालकांच्या तुलनेत कंत्राटी चालकांना ‘कमी पगार’ दिला जातो. (हेही वाचा: Maharashtra-Karnataka Bus Service Suspended: कंडक्टरला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद; आरोपींविरुद्ध गुंड कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार)
Mumbai BEST Bus Servises:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)