Load shedding In Pune And Pimpri Chinchwad: विजेची मागणी वाढल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन तासाचे लोडशेडिंग

मागणी वाढल्यामुळे सोमवारी लोणीकंदच्या 400 KV एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सब स्टेशनवर अतिरिक्त भार पडला.

Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महाट्रान्सको) सोमवारी अचानक वीज वापर वाढल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अनेक भागात दोन तासांचे लोडशेडिंग लागू केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागणी वाढल्यामुळे सोमवारी लोणीकंदच्या 400 KV एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सब स्टेशनवर अतिरिक्त भार पडला.

या अतिरिक्त भारामुळे सर्व ग्राहकांच्या सेवेत व्यत्यय येऊ नये म्हणून महाट्रान्सकोला सुमारे 132 केव्ही आणि 220 केव्ही एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सबस्टेशनचा वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे नगर रोड, खराडी, लोफेगाव, वडगाव शेरी, येरवडा आदी भागांचा वीजपुरवठा दुपारी एक ते दोन तास खंडित झाला होता. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील चिंचवड गाव, भोसरी एमआयडीसी, दिघी, लोणीकंद, थेऊर, उरुळी कांचन, चाकण येथील अनेक भागांचा वीजपुरवठाही याच काळात खंडित झाला होता.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement