Third Death Due To Guillain-Barre Syndrome: पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू; राज्यातील एकूण मृतांची संख्या 3 वर पोहोचली

पुणे जिल्ह्यात 130 जणांना हा आजार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, 36 वर्षीय ओला ड्रायव्हरला 21 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Yashwantrao Chavan Memorial Hospital) दाखल करण्यात आले होते.

Third Death Due To Guillain-Barre Syndrome: पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू; राज्यातील एकूण मृतांची संख्या 3 वर पोहोचली
Hospital Death | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Third Death Due To Guillain-Barre Syndrome: राज्यात शुक्रवारी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) मुळे तिसरा मृत्यू झाल्याची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये या जीबीएस (GBS) मुळे एका 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत पुण्यात जीबीएस विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात 130 जणांना हा आजार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, 36 वर्षीय ओला ड्रायव्हरला 21 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (Yashwantrao Chavan Memorial Hospital) दाखल करण्यात आले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण न्यूमोनियामुळे फुफ्फुसांना झालेला आघात आणि त्यानंतरचा मृत्यू असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये जीबीएसचाही समावेश आहे.

संशयित रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली -

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत निवेदनानुसार, गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) च्या एकूण संशयित रुग्णांची संख्या 130 वर पोहोचली आहे. यौपैकी 73 जणांना जीबीएस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुष्टी झालेल्या रुग्णांमध्ये पुणे महानगरपालिका (पीएमसी) मधील 25, पीएमसी अंतर्गत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील 74, पिंपरी चिंचवडमधील 13, पुणे ग्रामीणमधील नऊ आणि इतर जिल्ह्यांतील नऊ रुग्णांचा समावेश आहे. (हेही वाचा -Guillain-Barre Syndrome in Maharashtra: गुईलेन बॅरे सिंड्रोमबाबत महाराष्ट्र अलर्टमोडवर; मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश, जाणून घ्या लक्षणे व बचावाच्या उपाययोजना)

20 रुग्ण व्हेंटिलेटरवर -

जीबीएसची लागण झालेल्यांपैकी सध्या 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत. तत्पूर्वी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, तज्ञांच्या पथकाने विविध नमुने गोळा केले असून प्रकरणांची चौकशी सुरू आहे. एनआयव्ही पुणे प्रयोगशाळेत संसर्ग झालेल्यांच्या मल आणि रक्ताचे नमुने तपासले जात आहेत, परंतु अद्याप प्रसारामागील कारणांबद्दल कोणतेही निश्चित पुरावे मिळालेले नाहीत. पुण्यातील 21 जीबीएस रुग्णांकडून गोळा केलेल्या 4 मल नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनम ​​बॅक्टेरिया आढळला, ज्यांची चाचणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे यांनी केली, तर काहींमध्ये नोरोव्हायरस आढळला. (हेही वाचा: GBS Outbreak In Maharashtra: पुण्यानंतर आता नागपूरात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या 6 नवीन रुग्णांची नोंद; 8 वर्षीय मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू)

पुण्यात एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय पथक -

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुण्यात एक उच्चस्तरीय बहु-विद्याशाखीय पथक पाठवले आहे, जे राज्य अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्यास आणि शहरात गिलेन बॅरे सिंड्रोम (GBS) च्या संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांमध्ये वाढ व्यवस्थापित करण्यास मदत करणार आहे. राज्यात पाठवलेल्या केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) दिल्ली, निमहंस बेंगळुरू, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रादेशिक कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), पुणे येथील सात तज्ञांचा समावेश आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 01:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).