GBS Outbreak In Maharashtra: पुण्यानंतर आता नागपूरात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या 6 नवीन रुग्णांची नोंद; 8 वर्षीय मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू
आतापर्यंत मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोमचे (GBS) रुग्ण आढळले आहेत. परंतु, आता यात नागपूरचाही (Nagpur) समावेश झाला आहे. नागपुरात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून नागपूर महानगरपालिकेने शहरात (NMC) अलर्ट जारी केला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
GBS Cases in Nagpur: सध्या महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोमचे (GBS) रुग्ण आढळले आहेत. परंतु, आता यात नागपूरचाही (Nagpur) समावेश झाला आहे. नागपुरात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून नागपूर महानगरपालिकेने शहरात (NMC) अलर्ट जारी केला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नागपुरात, GBS च्या दोन रुग्णांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापी, साम टीव्हीच्या वृत्तानुसार, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात, सौम्य लक्षणांमुळे 19 वर्षीय रुग्णावर सामान्य वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत, तर गंभीर स्थितीत असलेल्या 8 वर्षीय मुलाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा -Guillain-Barré Syndrome: सोलापूरच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याचा संशय, पुण्यात रुग्णसंख्या १११ च्या पुढे)
अधिकाऱ्याकडून परिस्थितीवर बाराकईने लक्ष -
दरम्यान, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात 37 वर्षीय रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे आणि इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना घाबरू जावू नको, असे आवाहन करण्यात आलं आहे. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितलं की, प्रशासनाने या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी व्यापक व्यवस्था केली आहे. तसेच सरकारी रुग्णालये सतर्क ठेवण्यात आली आहेत. (हेही वाचा -Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; आता WHO करत आहे परिस्थितीची पाहणी, संघटनेने दिली नांदेड गावाला भेट (Video))
वैद्यकीय केंद्रात चार रुग्ण दाखल -
आतापर्यंत वैद्यकीय केंद्रात चार रुग्ण दाखल करण्यात आले आहेत, ज्यांचे वय 40, 19, 14, 8 वर्षे आहे. यापैकी 8 वर्षांच्या एका रुग्णाला गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालयातील 40 वर्षांच्या एका रुग्णाला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे गावंडे यांनी म्हटलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 01:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

