MNS Activists Booked For Threatening: भाईंदरमध्ये वृत्तपत्राच्या संपादकाला धमकावल्याप्रकरणी मनसे नेते Sandeep Rane यांच्यासह 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
या घटनेला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर आता भाईंदर पोलिसांनी कारवाई केली आहे.
MNS Activists Booked For Threatening: स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) 20 हून अधिक कार्यकर्त्यांसह शहरप्रमुख संदीप राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक साप्ताहिक वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टलच्या संपादकाला धमकावून, कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर आता भाईंदर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना 15 फेब्रुवारीची आहे.
तक्रारदार- शशी शर्मा यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीवर काशिमिरा येथील एका केक शॉपवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची बातमी देताना, छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन ऐवजी ‘शिवाजी जंक्शन’ असा उल्लेख केला होता. ही बाब थोर मराठा योद्ध्याचा अपमान असल्याचे सांगून, राणेंनी भडकवलेले मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संपादकांना केवळ धमक्याच दिल्या नाहीत, तर त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याच्या प्रयत्नात मोठ्या संख्येने एकत्र आले. मात्र, पोलीस वेळेवर पोहोचल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर संपादकांनी वेब-पोर्टलवर अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र कार्यकर्त्यांनी धमक्या देणे सुरूच ठेवले होते. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झळा आहे. (हेही वाचा: Salman Khan: लॉरेन्स बिश्नोई टोळीची मूसवाला हत्येत वापरलेल्या पिस्तुलाने सलमान खानला मारण्याची होती योजना)
पहा पोस्ट-